भूसंपादन, कंटूर सर्व्हे आणि उद्योग गुंतवणुकीची कामे तातडीने पूर्ण करा
- उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
· मंडणगड एमआयडीसीच्या विकासाला गती
मुंबई, दि. २१ : मंडणगड येथील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने करण्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया, कंटूर सर्व्हे, पायाभूत सुविधांचे नियोजन आणि उद्योग गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीची सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांना दिले.
उद्योगमंत्री डॉ.सामंत यांच्या मंत्रालयीन दालनात झालेल्या बैठकीस महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह आणि दूरदृश्यप्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंडणगड औद्योगिक क्षेत्रासंदर्भात भूसंपादन, पूर्वी अधिसूचित झालेल्या जमिनींची सद्यस्थिती, शेतकऱ्यांच्या मागण्या, कंटूर सर्व्हेचा प्रलंबित अहवाल तसेच नवीन औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
No comments:
Post a Comment