‘वन नेशन, वन ॲप्लीकेशन' संकल्पनेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल...
मुंबई, दि. 16 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘वन नेशन, वन ॲप्लीकेशन' या संकल्पनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधिमंडळात नेवा (नॅशनल ई-विधान ॲप्लीकेशन) ही संगणकीय कार्यप्रणाली स्वीकारण्याबाबत विधान भवन, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक व सादरीकरण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या, यापूर्वीच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, नेवा कार्यप्रणाली अनुसरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यासंदर्भातील पुढील कार्यवाही या बैठकीत करण्यात आली.
बैठकीस डॉ. सत्य प्रकाश, संसदीय कार्य मंत्रालय, भारत सरकारचे अतिरिक्त सचिव, जितेंद्र भोळे, सचिव (1) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, शिवदर्शन साठ्ये सचिव (4), सुप्रिया धावरे, सचिव, संसदीय कार्य विभाग, मंत्रालय
No comments:
Post a Comment