Wednesday, 8 July 2026

व्हिबी – जीरामजी’ कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती व्हिबी – जीरामजी’ मध्ये ग्रामीण भागाच्या उत्थानाची क्षमता

 'व्हिबी जीरामजीकार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

व्हिबी जीरामजीमध्ये ग्रामीण भागाच्या उत्थानाची क्षमता

- रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

 

मुंबई, दि. ८ : विकसित भारत - रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) २०२६' अर्थात व्हिबी - जीरामजी कायद्याविषयी कार्यशाळा विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आज पार पडली. या कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

            'व्हिबी - जीरामजी' योजनेमुळे ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना थेट प्रगतीच्या प्रवाहात आणले आहे. व्हीबी -जीरामजी या योजनेमध्ये माध्यमातून ग्रामीण भारताचे उत्थान करण्याची क्षमता आहे, असे उद्गार रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी व्हिबी - जीरामजी कायद्यावर प्रकाश टाकताना काढले.

 

कार्यशाळेच्या शुभारंभीय कार्यक्रमाला व्यासपीठावर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, आमदार तथा रोजगार हमी योजना समिती प्रमुख सुनील शेळके, केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सहसचिव रोहिणी भाजीभाकरे आणि सचिव अप्पासो धुळाज उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi