Friday, 24 July 2026

कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनासाठी पुढाकार घ्यावा

 कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनासाठी पुढाकार घ्यावा

– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

· गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नॅक मूल्यांकन, अपार आयडी, आणि इंटर्नशिपवर भर दयावा


मुंबई, दि. २२ जुलै : राज्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने नॅक मूल्यांकनास प्राधान्य द्यावे, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अपार आयडी, एबीसी आयडी नोंदणी आणि इंटर्नशिप उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.


राज्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते. बैठकीस महाराष्ट्र राज्य विना अनुदानित महाविद्यालय संघाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून विविध प्रश्न मांडले.


बैठकीत राज्यातील एकूण ३,८२९ महाविद्यालयांपैकी २,५९८ विना अनुदानित आणि १,२३१ अनुदानित महाविद्यालये असल्याची माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील महाविद्यालयांना पीएच.डी./नेट/सेट अर्हताधारक शिक्षकांची उपलब्धता, विद्यापीठांना भरावे लागणारे वार्षिक संलग्नीकरण शुल्क, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत न मिळणे, तसेच त्यामुळे महाविद्यालयांवर येणारा आर्थिक ताण आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi