Friday, 24 July 2026

महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी मोठी झेप · महाराष्ट्र शासन आणि जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशन यांच्यात सामंजस्य करार

 महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी मोठी झेप

·        महाराष्ट्र शासन आणि जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशन यांच्यात सामंजस्य करार

 

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या थेट परकीय गुंतवणूक, अनिवासी भारतीय व राजशिष्टाचार विभाग आणि जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशन (जेसीएएफ) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराच्या माध्यमातून राज्यात थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करणे, भांडवल उभारणीला चालना देणे, ज्ञान देवाणघेवाण वाढविणे तसेच जागतिक गुंतवणूकदारांशी संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

 

या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील उद्योग, पायाभूत सुविधा आणि विविध विकास क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

 

करारानुसार जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशन आपल्या जागतिक संस्थात्मक, कॉर्पोरेट, अनिवासी भारतीय, आर्थिक व शैक्षणिक नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावणार आहे. तसेच जागतिक गुंतवणूकदारांना भारतातील कररचना, फेमा, कंपनी कायदे आणि अन्य कायदेशीर बाबींविषयी तांत्रिक मार्गदर्शन व सल्लागार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi