ई-बस खरेदीत कोणताही गैरप्रकार नाही;
पुरवठा वाढविण्यासाठी बेस्टला निर्देश देणार
- राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. १० : बेस्ट उपक्रमाच्या ई-बस खरेदी प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. २०१९-२० या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असली, तरी २०२२ ते २०२६ या कालावधीत अपेक्षित प्रमाणात बस खरेदी झालेली नाही. दोन निविदाकारांपैकी एका कंपनीने केवळ ५० बसेसचा पुरवठा केला असून, ई-बसची संख्या वाढविण्यासाठी बेस्ट उपक्रम समितीला आवश्यक निर्देश देण्यात येतील तसेच या संदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमामार्फत २०१९-२० या कालावधीत मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ई-बस खरेदीबाबत सदस्य तुकाराम काते यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या धोरणानुसार बसच्या मूळ किमतीच्या ४० टक्के आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार १० टक्के अनुदान दिल
No comments:
Post a Comment