बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'भारत टॅक्सी' सेवेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी, सहकार हे केवळ संस्था चालवण्याचे माध्यम नसून सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. 'भारत टॅक्सी'च्या माध्यमातून डिजिटल बुकिंग, पारदर्शक व्यवहार आणि सुरक्षिततेसोबत प्रवाशांना परवडणाऱ्या दरात प्रवास उपलब्ध होणार असून, विमानतळावरून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा दिलासा मिळेल. तसेच या उपक्रमामुळे हजारो बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन चालकांना सन्मानाचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment