Friday, 3 July 2026

रेल्वे स्थानके आणि प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती मुक्तपणे वावरत असल्याची

 राज्यमंत्री कदम म्हणाले की, रेल्वे स्थानके आणि प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती मुक्तपणे वावरत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त पथकांमार्फत सर्व प्रमुख स्थानकांवर विशेष मोहीम राबवून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यात येणार असून रेल्वे स्थानकांवर फेस रेकग्निशन तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. तसेच रेल्वे डब्यांमधील सुरक्षाव्यवस्थेचाही आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाईल, असे त्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi