या वर्षीच्या महागणेशोत्सव उपक्रमांचा शुभारंभाही यानिमित्ताने होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव विधायक उपक्रमांसह शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी उत्सवांचा इतिहास, उत्सव आणि सामाजिक भान,आर्थिक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, विधायक स्वरूपातील कार्यकम संयोजन, नेतृत्व विकास या विषयांवर तज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वात मुंबईतील ज्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली, त्या केशवजी नाईक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मंडळाच्या शतकोत्तर वाटचालीचा मार्गदर्शनपर आढावा घेण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठी भाषा, मराठी संस्कृती, विकसित भारताच्या संकल्पनेतील ‘वसुधैव कुटुम्बकम’ या उक्तीप्रमाणे असणारी वैश्विक कल्याणाची भावना यांचा प्रचार व प्रसार, मूल्याधारित सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमांना बळकटी इत्यादी साध्य करणे अपेक्षित आहे.
No comments:
Post a Comment