Friday, 24 July 2026

चरणसेवा'ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; · ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ

 वृत्त क्र. 2687

'चरणसेवा'ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य;

·         ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ

 

मुंबई, दि. २३ : यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील १४ जिल्ह्यांतील ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी थेट चरणसेवा आणि आरोग्यसेवेचे लाभ घेतला. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या 'चरणसेवा' उपक्रमाचा समारोप शुक्रवार, २४ जुलै रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.

आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना होणारा शारीरिक ताण, स्नायूदुखी, पायांना येणारे फोड, थकवा तसेच पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. मागील वर्षी सात जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदा विस्तार करून तो दिंडी मार्गावरील १४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi