Friday, 10 July 2026

महामार्गालगत स्थानिक वृक्षांचेच रोपण

 महामार्गालगत स्थानिक वृक्षांचेच रोपण

- मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

·         वृक्षसंवर्धन करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्राधान्य

 

मुंबई, दि.१० : महामार्गालगत करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणामध्ये स्थानिक प्रजातींच्या वृक्षांचेच रोपण करण्यात येईल. तसेच, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम पुढाकाराने करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.

 

थेऊर–लोणीकंद येथील अष्टविनायक महामार्ग रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिपूरक वृक्षारोपणातील कथित उल्लंघनाबाबत सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भोसले बोलत होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi