पोषण शिक्षणातून निरोगी पिढी घडविण्याचा प्रयत्न
शालेय विद्यार्थ्यांमध्ये सकस आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीची सवय निर्माण करण्यासाठी पुणे, सिंधुदुर्ग आणि मुंबई जिल्ह्यातील २३५ शाळांमध्ये पोषण शिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत सुरक्षित आणि सकस आहाराचा संदेश पोहोचविण्यात आला.
४७० शिक्षकांना 'हेल्थ अँड वेलनेस अॅम्बेसेडर' म्हणून प्रशिक्षित करण्यात आले असून, सर्व शाळांमध्ये 'सेहत क्लब' स्थापन करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि पोषणविषयक जनजागृतीसाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment