Thursday, 30 July 2026

राज्यात वृक्ष वाढविण्यासाठी 5 टिश्यू कल्चर प्रयोगशाळा

 राज्यात वृक्ष वाढविण्यासाठी 5 टिश्यू कल्चर प्रयोगशाळा

- वनमंत्री गणेश नाईक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचा चेहरामोहरा बदलत आहे. या विभागाच्या विकासासाठी सर्व सहकार्य मिळत आहे. म्हणूनच व्याघ्र संवर्धनासोबतच नवनवीन संकल्पनांच्या अंमलबजावणीतून वनविभागाचे कार्य पुढे जात आहे. राज्यात 300 कोटी वृक्षारोपणाचा ध्यास विभागाने घेतला असून जास्तीत जास्त रोप तयार करण्यासाठी राज्यात 5 ठिकाणी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारण्यात आल्याचे  वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

            आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या औचित्याने वनविभागाद्वारे आयोजित याविशेष परिषदेच्या माध्यमातून राज्यातील व्याघ्र प्रकल्पांतून पर्यटनाला चालना व रोजगार निर्मिती होईल आणि येत्या काळात अशा आयोजनांना व्यापक स्वरूप प्राप्त होईल असा विश्वास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi