Saturday, 27 June 2026

अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बिंदूनामावली (रोस्टर) पडताळणीचे काम

 शैक्षणिक योजनांचा आढावा घेताना मंत्री प्रा. वुईके यांनी अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बिंदूनामावली (रोस्टर) पडताळणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आयुक्त स्तरावरून तात्काळ अधिकृत पत्र निर्गमित करण्यात यावे. तसेच, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विद्यापीठांमध्ये येत्या ४ जुलैपर्यंत जागा निश्चित करण्यात याव्यात. ही जागा सर्व सोयींनी युक्त आणि चांगल्या दर्जाची असावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचेही त्यांनी सूचित केले.

विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ३० जून रोजी आश्रमशाळांमध्ये 'प्रवेशोत्सव' साजरा करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशासोबतच मोजे आणि बूट देखील वेळेत मिळतील, याची काटेकोर दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे सांगत या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक निमंत्रित करावे, असे आवाहनही मंत्री प्रा. अशोक वुईके यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi