राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’
मुंबई, दि. २५: सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जागर समतेचा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता राजर्षी शाहू सभागृह, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर इमारत, दादर (प.), मुंबई येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात विष्णू शिंदे आणि सहकलाकार समता, सामाजिक परिवर्तन आणि मानवतेचा संदेश आपल्या प्रभावी कलासादरीकरणातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणार आहेत. राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता, शिक्षणाचा प्रसार आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थेचे प्रणेते होते. शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य भारतीय समाजजीवनात अतुलनीय मानले जाते. त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment