राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा
-आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके
मुंबई, दि. २५: राज्यातील आदिवासी महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी 'राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण' योजनेची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करून आदिवासी भागात महिला बचत गटांचे जाळे निर्माण करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके यांनी दिले.
बैठकीत प्रामुख्याने ‘राणी दुर्गावती योजने’च्या माध्यमातून महिला बचत गट निर्मिती करण्याची रुपरेषा करण्याबाबत आदिवासी विकास मंत्री प्रा. उईके म्हणाले, या योजनेअंतर्गत स्थापन करण्यात येणारे आदिवासी महिला बचत गट हे 'उमेद' (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) च्या धर्तीवर अत्यंत सुव्यवस्थित आणि कार्यक्षम असावेत. या अभियानाला गती देण्यासाठी आणि स्थापन झालेल्या महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ९ ऑगस्ट २०२६ रोजी प्रकल्प अधिकारी कार्यालय स्तरावर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
No comments:
Post a Comment