Monday, 8 June 2026

जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त दिलखुलास कार्यक्रमात डॉ. प्रियांका धायतडक यांची विशेष मुलाखत

 जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त

दिलखुलास कार्यक्रमात डॉ. प्रियांका धायतडक यांची विशेष मुलाखत

 

मुंबई, दि. ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त विशेष भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जे.जे. रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रियांका धायतडक यांनी दृष्टिदानाचे महत्त्व, नेत्रदानाची प्रक्रिया तसेच समाजामध्ये प्रचलित असलेल्या विविध गैरसमजांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. ९ जून आणि बुधवार, दि. १० जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत न्युज ऑन AIR या ॲपवर देखील प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन निवेदिका हर्षदा कुलकर्णी यांनी केले आहे.

            दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान देणगी असून अनेक व्यक्ती कॉर्नियाच्या अंधत्वामुळे दृष्टीपासून वंचित राहतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्यासाठी दृष्टिदान ही अत्यंत महत्त्वाची आणि समाजोपयोगी चळवळ आहे. अधिकाधिक नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा आणि या कार्यात सहभागी व्हावे, यासाठी जागतिक दृष्टिदान दिन साजरा केला जातो.

त्याअनुषंगाने 'दिलखुलास' कार्यक्रमातून डॉ. धायतडक यांनी दृष्टिदान म्हणजे नेमके काय, नेत्रदानाची प्रक्रिया कशी पार पडते, कोण व्यक्ती नेत्रदान करू शकते, तसेच नेत्रदानाबाबत समाजात असलेले विविध समज-गैरसमज यावर सविस्तर माहिती दिली आहे. याशिवाय मृत्यूनंतर अल्पावधीत नेत्रदान करण्याचे महत्त्व आणि त्यातून अंधत्वग्रस्त व्यक्तींच्या जीवनात होणारा सकारात्मक बदल याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi