बालकांना पोषणासह चविष्ट आहार;
घरपोच आहारात नव्या पाककृतींचा होणार समावेश
मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १७ : अंगणवाडीतील बालकांसह गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देत नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री तटकरे यांनी स्वतः पोषण आहाराचा आस्वाद घेत त्याच्या गुणवत्तेची पाहणी केली.
No comments:
Post a Comment