जननी सुरक्षा योजना, कुटुंब नियोजन कार्यक्रम, क्षयरोग निर्मूलनासाठी निक्षय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण वेळेत मिळण्यासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची; तसेच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सादर केलेल्या नावीन्यपूर्ण आरोग्यविषयक प्रस्तावांना मंजूरी देण्याची मागणी करण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्यासाठी अनुदान वेळेवर उपलब्ध करून देणे, तसेच पायाभूत सुविधा कक्ष अंतर्गत प्रलंबित देयके तातडीने मंजूर करण्याबाबत यावेळी आग्रह धरण्यात आला.
No comments:
Post a Comment