Saturday, 13 June 2026

मॅग्नेट-२.० प्रकल्पांतर्गत राज्यात काढणीपश्चात सुविधांनी युक्त मेगा क्लस्टर्स उभारणार

 मॅग्नेट-२.० प्रकल्पांतर्गत राज्यात

काढणीपश्चात सुविधांनी युक्त मेगा क्लस्टर्स उभारणार

     पणन मंत्री जयकुमार रावल

 

         मुंबई परिसरात नवीन आंतरराष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणीस बळ मिळणार

 

मुंबई, दि. १२ : मॅग्नेट-२.० प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. जागतिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा राज्यातील बाजार व्यवस्थेत निर्माण करण्यात येणार असून, महाराष्ट्रात काढणीपश्चात सुविधांनी युक्त मेगा क्लस्टर्स विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट-२.०) प्रकल्पासाठी मॅपिंग स्टडी व संपूर्ण प्रकल्प आराखडा अंतिम करण्याबाबत पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी सहकार व  पणन  विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव तसेच प्रकल्पाचे सल्लागार व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रकल्पाच्या विविध घटकांचा आढावा घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi