Sunday, 28 June 2026

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

 महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद


• २,५०० हून अधिक उद्योजकांची उपस्थिती
• ४२ एमएसएमई व हस्तकला स्टॉल्सचे प्रदर्शन 
• विविध राष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार 
• उत्कृष्ट उद्योजकांचा गौरव

नवी मुंबई, दि. २७ जून : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSSIDC) मार्फत जागतिक बँक व केंद्र शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या RAMP कार्यक्रमांतर्गत आयोजित “महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६” हा भव्य कार्यक्रम आज सीआयडीसीओ एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.
“संकल्पातून सिद्धीकडे – From Resolution to Accomplishment” या संकल्पनेवर आधारित या परिषदेला राज्यभरातून २,५०० हून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) उद्योजक, निर्यातदार, स्टार्टअप्स, हस्तकला कारागीर, उद्योग संघटना, वित्तीय संस्था, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जागतिक MSME दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ४२ MSMEs, GI टॅग उत्पादने, पारंपरिक हस्तकला कारागीर आणि उद्योग सहाय्यक सेवा प्रदाते यांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनातून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ विस्तार, ब्रँडिंग आणि व्यवसाय वृद्धीच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या.
राष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार
परिषदेदरम्यान महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने 
Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA), National Small Industries Corporation (NSIC), National Test House (NTH) आणि Export Promotion Council for Handicrafts (EPCH) यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केले. या करारांमुळे राज्यातील MSMEs ना विपणन सुविधा, तंत्रज्ञान उन्नतीकरण, गुणवत्ता चाचणी व प्रमाणन, निर्यात प्रोत्साहन, बाजारपेठ उपलब्धता, कौशल्य विकास आणि क्षमता वृद्धी यांसारख्या सेवांचा लाभ मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रातील हस्तकला कारागीर व उद्योजकांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचे नवे दरवाजे खुलणार आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi