Tuesday, 16 June 2026

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम महत्त्वपूर्ण: उच्च शिक्षणात महिलांनी प्रशासकीय व संशोधन क्षेत्रात पुढे यावे

 महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम महत्त्वपूर्ण:

उच्च शिक्षणात महिलांनी प्रशासकीय व संशोधन क्षेत्रात पुढे यावे

-         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         MSFDAच्यावतीने आयोजित नारीदृष्टी निवासी कार्यक्रमाचे उद्घाटन

 

मुंबई, दि. १५ : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांच्या क्षमता विकासास चालना देण्यासाठी आणि त्यांच्यातील नेतृत्व गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे यांच्या वतीने ‘नारीदृष्टी’ (Nurturing Visionary Women Leaders for Transformation in Academia) या विशेष पाच दिवसीय निवासी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसचिव संतोष खोरगडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच विविध क्षेत्रांतील महिला, विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi