Wednesday, 3 June 2026

ॲग्रीगेटर टॅक्सी सेवांसाठी नियमावली तयार करावी टॅक्सी चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार

 ॲग्रीगेटर टॅक्सी सेवांसाठी नियमावली तयार करावी

टॅक्सी चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार

 -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. २ : महाराष्ट्रात ऑनलाइन ॲप आधारित ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सी सेवेबाबत परिवहन विभागामार्फत तातडीने नियमावली तयार करून या सेवेस परवानगी देण्यात येईल.  ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सीमुळे लाखो चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षा निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

सहकार टॅक्सी को.ऑपरेटिव्ह लिमिटेडची (भारत टॅक्सी) सेवा सुरु करण्यासंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रणधीर सावरकर, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, भारत टॅक्सीचे कर्नल हिमांशू, अदानी एअरपोर्ट चे कार्यकारी संचालक जीत अदानी, मुख्य अधिकारी बी व्ही.सी. के. शर्मा, एस. टी.सी.एल. संचालक अर्चना सिंग,  वाहतूक संस्थेचे रुपेश धुमाळ आणि विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ॲग्रीगेटर टॅक्सीमुळे चालकांच्या जीवनात परिवर्तन घडेल आणि नागरिकांना दर्जेदार सेवेचा लाभ मिळेल. या टॅक्सी सेवेच्या माध्यमातून छोट्या शहरापर्यंत सहज पोहचण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi