Saturday, 27 June 2026

महाराष्ट्र एमएसएमई परिषद व पुरस्कार 2026 साठी नोंदणी करण्याचे आवाहन

 महाराष्ट्र एमएसएमई परिषद व पुरस्कार 2026 साठी नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 26 जून : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त उद्या, 27 जून 2026 रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात "महाराष्ट्र एमएसएमई (MSME)  परिषद व एमएसएमई (MSME) पुरस्कार 2026" या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणाऱ्या या परिषदेसाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योजकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

"संकल्पातून सिद्धीकडे - From Commitment to Achievement" ही यंदाच्या परिषदेची संकल्पना असून राज्यभरातील सुमारे 2,500 हून अधिक एमएसएमई (MSME)  उद्योजक, वित्तीय संस्था, उद्योगतज्ज्ञ, गुंतवणूकदार तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. निर्यातवृद्धी, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, शाश्वत औद्योगिक विकास, वित्तपुरवठा आणि महिला उद्योजकता यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विविध चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या परिषदेदरम्यान महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योगांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये कारागीर व हस्तकला, नेक्स्टजेन एमएसएमई (MSME), डिजिटल व AI उत्कृष्टता, सेवा, उत्पादन, हरित उद्योग, महिला उद्योजक, निर्यात आणि चॅम्पियन एमएसएमई (MSME)  अशा नऊ श्रेणींचा समावेश आहे. चॅम्पियन एमएसएमई पुरस्कार वगळता इतर सर्व श्रेणींमध्ये एक्सलन्सआणि अचिव्हर्सया दोन उपश्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi