वर्ष 2025 मधील महाराष्ट्राचे पुरस्कार मानकरी
वर्ष 2025साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये शहनाई वादनासाठी शैलेश भागवत, दिग्दर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रमोद डी. पवार, नाट्यसंगीत क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानासाठी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की; तसेच कथक नृत्य क्षेत्रातील विशेष कार्यासाठी मनीषा साठे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे; तसेच ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारां’मध्ये हार्मोनियम वादनातील प्रभुत्वासाठी तन्मय देवचके आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण प्रताप जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारांचे स्वरूप अत्यंत प्रतिष्ठेचे असून, अकादमी पुरस्काराचे स्वरूप 1,00,000 रुपये, ताम्रपट आणि शाल असे आहे, तर युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारांतर्गत 25,000 रुपये, ताम्रपट आणि शाल देऊन सन्मानित केले जाते. हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याचे अकादमीतर्फे कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment