Friday, 12 June 2026

वर्ष 2024 मधील महाराष्ट्राचे पुरस्कार मानकरी

  

वर्ष 2024 मधील महाराष्ट्राचे पुरस्कार मानकरी

वर्ष 2024 साठी जाहीर करण्यात आलेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय गायन क्षेत्रातील ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर आणि अभंग गायनासाठी प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांचा समावेश आहे. अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेते अरुण नलावडे, पारंपरिक रंगभूमी क्षेत्रासाठी मुकुंद मराठे, लोकनृत्य क्षेत्रासाठी सुभाष नारायण नकाशे; तसेच नृत्य क्षेत्रातील संशोधन आणि अभ्यासपूर्ण योगदानासाठी शुभदा वरदकर यांची निवड करण्यात आली आहे.उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारांमध्ये हिंदुस्तानी गायनासाठी कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, भारूड या लोकसंगीत प्रकारासाठी भावार्थ रामचंद्र देखणे, बाहुलीनाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण गणपत मसगे आणि लोकनृत्य व लोकसंगीतासाठी चेतन वामन खेडेकर यांची निवड झाली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi