महाराष्ट्राला भारत-आफ्रिका सहयोगाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी
सिडकोतर्फे महत्त्वपूर्ण आफ्रिका भारत व्यापार केंद्र (एआयबीसी) प्रस्तावित
•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडको आणि एआयईएफ यांच्यात आफ्रिका-भारत विशेष वाहन हेतू कंपनी स्थापन करण्याकरिता करार
मुंबई, दि.14 : आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र विकसित करण्याकरिता सिडको आणि आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन (एआयईएफ) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत आफ्रिका भारत करारावर स्वाक्षऱ्या करून आदान-प्रदान करण्यात आले.
मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या बैठकीस नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, आफ्रिका इंडिया ईकॉनॉमिक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जी. रथिनवेलू, संयुक्त राष्ट्रसंघ राजदूत न्यूयॉर्कचे राजदूत टी. एस. तिरुमूर्ती, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिडकोतर्फे आफ्रिका भारत व्यापार केंद्र (एआयबीसी) नवी मुंबई येथे प्रस्तावित असून भारत व आफ्रिकन राष्ट्रांमधील आर्थिक, व्यापारी व सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे एकात्मिक केंद्र म्हणून हा प्रकल्प संकल्पित आहे. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि संस्थात्मक भागीदारी यांना चालना देण्याच्या उद्देशाने आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन (एआयईएफ) यांच्या सहयोगाने हा प्रकल्प आकारास येणार आहे. ग्लोबल साउथ देशांमधील सहाकार्याकरिता भारताचे नेतृत्व मान्य होत असताना, भारत-आफ्रिकेतील सध्याच्या 96 अब्ज अमेरिकन डॉलर भागीदारीच्या क्षमता अधिक वाढीस लागाव्या याकरिता हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आफ्रिका भारत व्यापार केंद्र हा परिवर्तन घडवून आणणारा प्रकल्प असून याद्वारे भारत-आफ्रिका संबंधांचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून महाराष्ट्र उदयास येणार आहे. व्यापार, गुंतवणूक आणि संस्थात्मक सहयोग यांकरिता समर्पित परिसंस्था निर्माण करण्यासह या प्रकल्पाद्वारे आफ्रिकन देशांबरोबरचे आर्थिक संबंध बळकट होऊन विकास, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीकरिता नवीन संधी खुल्या होणार आहेत. जागतिक पटलावर महाराष्ट्राला मानाचे स्थान प्राप्त होण्यासह ग्लोबल साउथमधील भारताच्या विस्तारणाऱ्या भूमिकेकरिता हा प्रकल्प योगदान देणार
No comments:
Post a Comment