Wednesday, 20 May 2026

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी 'कसं काय?' मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 वृत्त 1797

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी

'कसं काय?' मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 

मुंबई, दि. १९ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. या निमित्ताने ‘कसं काय?’ या जनजागृतीपर गाण्याचे तसेच पोस्टर्सचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सर्व विभागाचे मंत्री यावेळी उपस्थित होते.

 

 ग्रामीण महाराष्ट्रात आरोग्य जागृतीची नवी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारातून ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi