तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे महत्त्व
- योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र
· ‘योगरंग’ सत्रात हंसाजी योगेंद्र यांचा आरोग्यदायी जीवनशैलीवर भर
मुंबई, दि. ६ : आज जग झपाट्याने तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असून नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. मात्र, ही प्रगती साधताना आपले मन आणि शरीर सुदृढ आहे का, याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ माहिती ऐकणे पुरेसे नसून ती आत्मसात करण्यासाठी मनाची एकाग्रता आणि स्थिरता आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे अत्यंत महत्त्व असल्याचे योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी सांगितले.
मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक वारी 2.0 – महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘योगरंग – योगा फॉर अ हेल्दी लाइफ’ या सत्रात योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र बोलत होत्या.
योगासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नसून तो दैनंदिन जीवनशैलीत रुजवला पाहिजे, असे सांगत संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी काम करतानाही स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले. काम महत्त्वाचे आहे, पण स्वतःला विसरून काम करू नका. स्वतःची जाणीव ठेवूनच काम करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
No comments:
Post a Comment