Friday, 29 May 2026

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी एनसीसी महत्त्वाचे

 विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी एनसीसी महत्त्वाचे

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         राज्यातील एनसीसी प्रशिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार

 

मुंबई, दि. २६ : राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच देशहिताची भावना निर्माण करणारी प्रभावी चळवळ असून राज्यातील एनसीसी प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

 

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील एनसीसी स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स आणि प्रशिक्षण केंद्रांशी संबंधित विविध सुविधा, प्रशिक्षण व्यवस्था आणि नियोजन याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, एनएसएस विभागाचे संचालक मिलिंद काळे, एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी, एनसीसी ग्रुपचे ग्रुप कॅप्टन के. डी. दीपक, कमांडर पी. सुदान, महाराष्ट्र नौदलचे मेजर ईशान कृष्णा तसेच एनसीसी गर्ल्स बटालियनचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एनसीसी ही केवळ शैक्षणिक उपक्रमांची योजना नसून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, शिस्त, राष्ट्रसेवा आणि संघटन कौशल्य विकसित करणारे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. विद्यार्थ्यांचा प्रशिक्षणामध्ये अधिकाधिक सहभाग वाढण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून प्रशिक्षणाचे नियोजन अधिक प्रभावी आणि कालबद्ध पद्धतीने करण्यात यावे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi