Friday, 29 May 2026

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रम प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली व्यसनमुक्तीची शपथ

 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रम

प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली व्यसनमुक्तीची शपथ

 

मुंबई, दि. २६ : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कांबळे आणि समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते व्यसनमुक्तीविषयक पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. कांबळे यांनी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे महत्व अधोरेखित करत तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक परिणामांबाबत माहिती दिली.

विशेषतः २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचे नमूद करत डॉ. कांबळे यानी युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनजागृती आणि सामूहिक सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi