Monday, 11 May 2026

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणी प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा वेगाने उभाराव्या

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणी प्रकल्पासाठी

पायाभूत सुविधा वेगाने उभाराव्या

-         बंदरे विकास मंत्री नितेश राणे

 

·         जहाजबांधणी उद्योगासाठी स्थळ निवडीच्या प्रक्रियेला वेग

·         तांत्रिकदृष्ट्या सक्षम स्थळांचा आढावा

मुंबई, दि. ७ : राज्यातील जहाजबांधणी व सागरी पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग या तीन संभाव्य स्थळांचा सविस्तर तांत्रिक व आर्थिक आढावा घेण्यात आला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यास प्राधान्य देत संबंधित स्थळांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण, पुनर्भरण, ट्रॅफिक लाँचिंग तसेच सागरी पायाभूत सुविधांच्या नियोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. जहाजबांधणी उद्योगात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ऑपरेटर्सना प्राथमिक स्वरूपातील माहिती व अहवाल उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी जहाजबांधणी प्रकल्पासाठी संभाव्य स्थळांबाबत तांत्रिक क्षमता, समुद्रातील खोली, भूगर्भीय स्थिती, संपर्क व्यवस्था आणि भविष्यातील औद्योगिक संधी संदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले. बैठकीस महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, हस्कोनिंग कंपनीचे जॉन सम्यूएल, बिजापूर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi