पायाभूत सुविधांमुळे शासनाच्या सेवा अधिक वेगवान
मुंबई, दि. 6 : देशातील डिजिटल पायाभूत सुविधांमुळे शासनाच्या सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित होत आहेत. आधार, यूपीआय आणि एपीआय-आधारित प्रणालींवर उभे असलेले हे आर्किटेक्चर देशाच्या डिजिटल परिवर्तनाचा भक्कम पाया ठरत असल्याचे प्रतिपादन वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी केले.
मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागामार्फत आयोजित ‘टेकवारी २.० महा-टेक लर्निंग वीक’ अंतर्गत ‘इंडिया स्टॅक आणि महा-सारथी’ या विषयावरील सत्रात अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी आणि विरेंद्र सिंह यांनी डिजिटल गव्हर्नन्स, डेटा वापर आणि कौशल्यविकासाच्या संधींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment