टेकवारी २.०: प्रशासनाला नाविन्यपूर्णतेचा ध्यास !
- श्रीमती आर. विमला ( भा.प्र.से )
निवासी आयुक्त आणि सचिव, महाराष्ट्र शासन
(पीएचडी स्कॉलर, आयआयटी बॉम्बे)
नवी दिल्ली, दि. १० : महाराष्ट्राचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाने ४ ते ८ मे २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत एका सरकारी कार्यालयापलीकडे जाऊन एक वेगळेच स्थित्यंतर अनुभवले. या कालावधीत आयोजित टेकवारी २.० उपक्रम हा प्रशिक्षण, सहयोग आणि ऋणानुबंधाचा एक अनोखा प्रयोग ठरला. जिथे तंत्रज्ञान शासनाला भेटले, आरोग्य प्रशासनाशी जोडले गेले आणि संस्कृतीने नवकल्पनेशी सुंदर सोबत केली !
शासनात आपण अनेकदा व्यवस्था, धोरण आणि प्रक्रियांबद्दल बोलतो. परंतु, टेकवारी २.० ने लोक, त्यांची मने, त्यांची मूल्ये, त्यांचे आरोग्य, त्यांची सर्जनशीलता आणि बदलत्या जगाशी जुळवून घेण्याची त्यांची इच्छाशक्ती याबद्दलच प्रशासन अंतिमतः कार्यरत असते, याची जाणीव करून दिली.
महाराष्ट्राच्या 'वारी' परंपरेतून प्रेरणा घेऊन, जिथे हजारो मंडळी भक्ती, शिस्त आणि ध्येयाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात, टेकवारीने तीच भावना प्रशासनात आणली आणि त्यातून हा 'लर्निंग वीक' (शिक्षण सप्ताह) नवविचारांची आधुनिक 'यात्रा' ठरला.
No comments:
Post a Comment