Wednesday, 20 May 2026

दुग्धभेसळ प्रतिबंधासाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचाही निर्णय

 दुग्धभेसळ प्रतिबंधासाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. दूध परीक्षण यंत्रे, त्वरित चाचणी संच तसेच दूध विश्लेषण प्रणाली यांसारखी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत असून, राज्यातील फिरत्या अन्न परीक्षण प्रयोगशाळांची संख्या वाढविण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच नियमित तपासण्या, प्रशिक्षण आणि जनजागृती मोहिमांवर विशेष भर दिला जात आहे.

 यामुळे ग्राहकांना शाही पनीरसारख्या पदार्थांमध्ये प्रत्यक्ष पनीर वापरण्यात आले आहे की चीज ॲनालॉग’, याची स्पष्ट माहिती मिळणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल संघटनांशी चर्चा करून नव्या नियमांविषयी जनजागृती सुरू केली असून, उपाहारगृहे व भोजन व्यवस्था पुरवठादारांना सामूहिक संदेशाद्वारे मार्गदर्शक सूचना पाठविण्यात येत आहेत. याशिवाय राज्यभर तपासणी मोहीम राबवून आवश्यकतेनुसार नमुने संकलित करून प्रयोगशाळा परीक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ग्राहकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करताना त्यावरील माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे तसेच दुग्ध पर्यायी पदार्थअसा उल्लेख आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ग्राहकांची दिशाभूल झाल्यास १८००-२२२-३६५ या विनामूल्य दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi