Wednesday, 27 May 2026

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे

 अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे

-उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         पुणे येथे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन

 

मुंबई, दि. २६ : भारतीय प्रशासकीय सेवा ही देशाच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ आहे. प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेची तयारी करून देत नाहीत, तर त्यांच्यात नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवत असते. अशा संस्थाची व्याप्ती वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून पुणे येथे प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितल.

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांनी आयोजित केलेल्या संघ लोक सेवा आयोग (यूपीएससी) च्या यशस्वी उमेदवारांच्या सत्कार समारंभावेळी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थाचे संचालक डॉ. भावना पाटोळे, सहसंचालक रुपेश राऊत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi