Tuesday, 12 May 2026

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एसटी उभारणार २०० चार्जिंग स्टेशन

 सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एसटी उभारणार २०० चार्जिंग स्टेशन

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबई, दि. ११ : एसटी महामंडळातील सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

 

मंत्रालयीन दालनात आयोजित बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi