त्याचप्रमाणे “जन आरोग्य समिती (JAS)” व “रुग्ण कल्याण समिती (RKS)” या समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित सेवा, सेवेची गुणवत्ता व निधीच्या पारदर्शक वापरासंबंधी लक्ष ठेवण्याची भूमिका बजावतात.
ग्रामीण भागासाठी कार्यरत असलेल्या "ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती (VHNSC)" मध्ये अशासकीय सदस्य म्हणून ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य (प्राधान्याने महिला), बचत गट, तरुण मंडळ, वन सुरक्षा समिती, महिला मंडळ, सामाजिक संस्था, गरोदर व स्तनदा माता, तीनवर्षा पर्यंतचे मुल असलेली माता व शासकिय रुग्णालयात आरोग्य सेवा घेणारे किंवा बरे झालेले दिर्घकालीन आजाराचे रुग्ण यांचा सदस्य म्हणून समावेश असणे अपेक्षित आहे.
शहरी भागासाठी कार्यरत असलेल्या "महिला आरोग्य समिती (MAS)' मध्ये समाजकल्याण, सामाजिक बांधिलकी व नेतृत्व कौशल्य असलेल्या स्थानिक झोपडपट्टी भागातील जास्तीत जास्त वीस महिला सदस्यांचा समावेश अपेक्षित आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत "जन आरोग्य समिती" कार्यरत आहे. या समितीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती (VHNSC) अध्यक्ष/महिला सदस्य, महिला बचत गट अध्यक्ष, शालेय आरोग्यदूत, युवाकेंद्र युवा प्रतिनिधी, क्षयरोगमुक्त नागरिक, तसेच एक किंवा दोन मुलानंतर नसबंदी केलेला पुरुष यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश अपेक्षित आहे.
No comments:
Post a Comment