Thursday, 9 April 2026

विनापरवाना खाणी सुरू राहणार नाहीत याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी

 विनापरवाना खाणी सुरू राहणार नाहीत याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. ८ : कोकण विभागात वैध कागदपत्रे असणाऱ्या खाणींबरोबरच कागदपत्रांची आणि मान्यतांची पूर्तता न करता खाणी सुरू असल्याची बाब निदर्शनास आली होती. अशा अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे कोणत्याही खाणी सुरू राहणार नाहीतयाची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावीअसे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

 

यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बैठक घेण्यात येईल असे उत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. त्यानुसार आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार सुनील प्रभू उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi