शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई ;
१.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड
मुंबई: दि.३, शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. २ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेवरून व गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर रोडवरील मौजे खोजेवाडी शिवारात धाड टाकण्यात आली.
हॉटेल साईयश परिसरात केलेल्या या कारवाईदरम्यान एलपीजी टँकरचे सील तोडून गॅस चोरी करताना दोन व्यक्ती रंगेहात आढळून आल्या. तपासात एचपी कंपनीचे दोन कॅप्सूल टँकर (क्रमांक MH43 K 5921 व MH43 CK 5747) आढळले. या टँकरमध्ये अनुक्रमे १७,५९० किलो व १७,६३० किलो एलपीजी गॅस साठवलेला होता.
No comments:
Post a Comment