सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 31 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड
नागपूर, दि.26 : सावनेरच्या मुख्य रस्त्याचे सौंदर्यीकरण व मौनीबाबा आश्रमाचे भूमिपूजन आज झाले. खत आणि कोल गॅसिफिकेशन असे दोन मोठे प्रकल्प या भागात उभे राहणार आहेत यातून 40 हजारावर रोजगार निर्मिती होणार आहे. या सर्व प्रकल्पांमधून सुजलाम- सुफलाम सावनेर होण्याच्या दिशेने सुरुवात झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
जगात युद्धाची परिस्थिती असताना भारत विश्वशांतीच्या दिशेने विचार करतो आणि विश्वशांतीसाठी विश्व महाआरतीचे सावनेर मध्ये झालेले आयोजन भूषणावह असल्याच्या भावना व्यक्त करून महाआरतीच्या गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
श्री रामनवमीच्या पवित्र पर्वावर सावनेर नगरपरिषद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती विश्व विक्रमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजनही त्यांचा हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्य मंत्री ॲड आशिष जयस्वाल,आमदार डॉ. आशिष देशमुख ,माजी मंत्री रणजित देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment