Friday, 17 April 2026

शारदा मंदिर हायस्कूल गावदेवी मुंबई येथे समाधान शिबिराचे आयोजन

 शारदा मंदिर हायस्कूल गावदेवी मुंबई येथे समाधान शिबिराचे आयोजन

 

मुंबईदि.१६ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा एक अंतर्गत उद्या शुक्रवार१७ एप्रिल २०२६ रोजी शारदा मंदिर हायस्कूलहरिश्चंद्र गोरेगावकर मार्गजे.के टॉवर समोर गावदेवीमुंबई येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेअशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

 

सर्वसामान्य जनता व शेतकरी यांची महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न निकाली काढणेमहाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदीची जनजागृती करणे आणि प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच  डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे आणि नागरिकांना सिंगल डे सर्विस डिलिव्हरीद्वारे सेवा पुरविणे हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

 

शारदा मंदिर हायस्कूलहरिश्चंद्र गोरेगावकर मार्गजे.के टॉवर समोर गावदेवीमुंबई येथे  सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकमहिला यांना विविध प्रकारचे दाखलेप्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे लाभ व सेवांचा सुद्धा समावेश करण्यात येणार असून इतर विभागाशी सुद्धा समन्वय करून त्यांच्या सेवांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi