आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली पाहिजे आणि अधिकाधिक रुग्णांना वेळेत अवयवरुपी नवजीवन मिळाले पाहिजे. त्यासाठी शासकीय रुग्णालयांमधील अवयवदान प्रक्रिया अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. विशेषतः ब्रेन-डेड (मेंदू मृत) रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रभावी समुपदेशन करून अवयवदानासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment