रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये
दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’
मुंबई, दि. ७ : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र नव्हते ते होते स्वप्नांचे प्रतिबिंब. प्रत्येक रेषेत जिद्द, प्रत्येक रंगात आशा आणि प्रत्येक कलाकृतीत स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दडलेली होती. निमित्त होते सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग कलाकारांसाठीच्या विशेष कला कार्यशाळेचे.
No comments:
Post a Comment