Tuesday, 28 April 2026

मुंबईसह उपनगरातील म्हाडाच्या इमारतींच्या सेवाशुल्काबाबत सर्वानुमते निर्णय घेणार

 मुंबईसह उपनगरातील म्हाडाच्या इमारतींच्या सेवाशुल्काबाबत सर्वानुमते निर्णय घेणार

-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि.२७ : मुंबईसह उपनगरातील म्हाडाच्या ५६ इमारतींना म्हाडाकडून थकीत सेवाशुल्काची देयके भरण्यासंदर्भात सर्वानमुते निर्णय घेतला जाईल असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र विधानसभा नियम १०१ अन्वये विधानपरिषद लक्षवेधी क्र ५६९ मुंबईसह उपनगरातील म्हाडाच्या ५६ इमारतींना म्हाडाकडून थकीत सेवाशुल्काची देयके भरण्यासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी २०२१ ते २०२६ पर्यंतच्या जुन्या दराने देयशुल्कासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याबाबत एकमत झाले. तसेच सदर प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठवून त्यांच्या समन्वयातून निर्णय घेतला जाईलअसे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये विधानपरिषद लक्षवेधी क्र ८२ माहिम येथील मच्छीमार कॉलनीपोलीस वसाहतपरिसरातील वसाहती तसेच म्हाडा कॉलनी येथील इमारतींचा क्लस्टर पध्दतीने विकास करणेबाबत बैठक पार पडली. या बैठकीत प्राथमिकदृष्ट्या सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. असेही आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

 

तसेच महाराष्ट्र विधानपरिषद ता.प्र.क्र. ६८३१ समता नगरकांदिवली (पूर्व) येथील म्हाडा गृहनिर्माण संस्थेच्या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत भाडेकरूंना दिलासा देणारा निर्णय घेण्याबाबत एकमत झाले. त्यासाठी म्हाडा मुंबईच्या माध्यमातून कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याबाबतचे निर्देश मंत्री शंभूराज देसाईंनी दिले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi