राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत अॅग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरू
- पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १६ : सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (एनआयपीएचटी) येथे आता बीबीए इन अॅग्रीबिझनेस हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला त्रिभुवन सहकारी विद्यापीठाने मान्यता दिली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ६० प्रवेशक्षमतेची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या आढावा बैठकीत पणन मंत्री जयकुमार रावल बोलत होते. यावेळी सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, संस्थेचे संचालक मिलिंद आकरे, मॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव आदी अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment