Friday, 17 April 2026

नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे उद्दिष्ट -

नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे उद्दिष्ट - मंत्री मंगल प्रभात लोढा महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे उद्घाटन संपन्न मुंबई, दि. १७ : नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच या समाधान शिबिराकडे ‘जनता दरबार’ म्हणून पाहत प्रत्येक नागरिकाच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत गावदेवी येथील शारदा मंदिर हायस्कूल येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मुंबई महानगरपालिकेचे स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi