Saturday, 4 April 2026

१५० दिवसांच्या ई – गव्हर्नन्स कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला तृतीय क्रमांक

 १५० दिवसांच्या ई – गव्हर्नन्स कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता

विभागाला तृतीय क्रमांक

मुंबईदि. २९ : राज्य शासनाच्या १५० ई – गव्हर्नन्स  कार्यक्रम अंतर्गत विविध शासकीय संस्थामहामंडळेप्राधिकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या स्पर्धेत ५७ मंत्रालयीन विभागांपैकी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २०० पैकी १७०.५० गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा गौरव प्रदान करण्यात आला.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलारमुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi