येवला तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाबाबत मंत्री छगन भुजबळ व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक
·
मुंबई, दि. २९ : येवला तालुक्यातील गेट नंबर ७७, ७६ आणि ७४ या तीन रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या कामांना मध्य रेल्वेकडून २०२६-२७ मधील सीओआरएसपी अंब्रेला योजनेमधून जूनमध्ये १३६.७९ कोटी निधी उपलब्ध करून ही कामे प्राधान्य क्रमाने हाती घेण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मध्य रेल्वेचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमधील बैठकीत झाला.
मंत्रालयातील छगन भुजबळ यांच्या दालनात आज येवला तालुक्यातील गेट नंबर ७७,७६ आणि ७४ येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल (आरओबी) बांधकामांना मंजुरी देण्यासाठी बैठक पार पडली.
No comments:
Post a Comment