Thursday, 2 April 2026

पशुधन उद्योजकता योजना ही महत्वपूर्ण ठरणार

 पशुसंवर्धन मंत्री मुंडे म्हणाल्या कीराज्यातील पशुसंवर्धन व्यवसायाला उद्योजकतेचे स्वरुप देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही महत्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेत राज्यस्तरीय योजना व जिल्हास्तरीय योजना असे दोन भाग आहेत. जिल्हास्तरीय योजनेत १५ तर राज्यस्तरीय योजनेत १२ विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. या योजना थेट लाभ हस्तांतरद्वारे (महाडिबीटी) पशुपालकांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. या योजनांची माहिती पशुपालकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi